सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

'ट्रान्सजेंडर अधिनियम २०१९' आणि सध्याच्या वास्तवांवर चर्चा; भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने आयोजन

डिजिटल पुणे    09-01-2025 10:46:39

पुणे : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने 'ट्रान्सजेंडर अधिनियम २०१९' आणि सध्याच्या वास्तवावर आधारित चर्चासत्र आयोजित करण्यात आले. हे चर्चासत्र मंगळवार, ८ जानेवारी २०२५ रोजी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त पार पडले.प्रमुख वक्ते मिस्ट फाउंडेशनचे संस्थापक श्याम (सॅम्युएल) कोन्नूर यांनी  या चर्चासत्रात मार्गदर्शन केले.

अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उज्वला बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र पार पडले.यावेळी उपप्राचार्या डॉ. ज्योती धर्म, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. विद्या ढेरे, जेंडर सेलचे  गर्व जग्यासी, मयांक पिल्लई आणि तिथी मित्तल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राचे आयोजन करण्यासाठी सौ. दिव्या सक्सेना आणि सौ. प्रियांका उंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रश्नोत्तर सत्रात प्रेक्षकांनी एलजीबीटीक्यू(LGBTQ+) व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मदत करण्यासाठी कृतीशील उपाययोजनांवर चर्चा केली.महाविद्यालयाने शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकांना आणि कार्यक्षेत्रात महिलांच्या यशस्वी कामगिरीसाठी विशेष कौतुक केले. सामाजिक उद्योजक आणि कार्यकर्ते श्री. कोन्नूर यांनी मिस्ट फाउंडेशनविषयी माहिती दिली, जे एलजीबीटीक्यू(LGBTQ+) समुदायासाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यांनी फाउंडेशनच्या वकिली मोहिमा, समुपदेशन, आधार गट तसेच  एलजीबीटीक्यू(LGBTQ+) व्यक्तींना भेडसावणाऱ्या आव्हानांवर,कायदेशीर प्रगती, मानसिक आरोग्य जनजागृती आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील समावेश यावर चर्चा केली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती