पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी पुणे आणि अखिल सांगवी जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल शिक्षण मंडळ केंद्रांतर्गत संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला मधील व्याख्यानाच्या पहिल्या दिवशी व्याख्याते डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी आपल्या व्याख्यानामध्ये ज्येष्ठांचे आरोग्य आणि अंधश्रद्धा या विषयावर बोलताना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला खऱ्या मित्राची गरज भासते, या मित्र आणि समाजातील समूह भावनेतून माणूस आपले जीवन जगत असतो. प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या अनुभवाचा खजिना त्याच्याकडे असतो या धावपळीतही हसण्याचा खजिना ज्याच्याकडे असेल तो खरा श्रीमंत असे मत व्याख्याते डॉ राजेंद्र कांकरिया यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे यांनी हसण्याने आयुष्य वाढते त्यामुळे व्यक्तीने नेहमी सकारात्मक असावे असे मत मांडले तसेच महाविद्यालयीन व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. विजय घारे यांनी प्रास्ताविक करताना या ज्येष्ठ साहित्याचा आम्हाला भविष्यात खूपच उपयोग होईल तसेच हसण्याने खरे सौंदर्य वाढेल असे मत व्यक्त केले. बही:शाल समिती समन्वयक प्रा. विक्रमादित्य मालतुमकर यांनी होणाऱ्या तीन दिवसाच्या व्याख्यानाचे रूपरेषा सांगितली. सदर कार्यक्रमाच्या नियोजन आणि मार्गदर्शनासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परीषद सदस्या तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संगीता जगताप , माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड श्री प्रशांत शितोळे यांनी शुभेच्छा दिल्या.
तर सूत्रसंचालन प्रा. संतोष सास्तुरकर यांनी केले . प्रमुख वक्त्यांचा परिचय अखिल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री रविंद्र निंबाळकर यांनी करून दिले ,आभार डॉ. भरत राठोड यांनी मानले. छायाचित्रण आणि तांत्रिक सहकार्य श्री प्रणित पावले यांनी केले. या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी डॉ.जितेंद्र वडसिंगकर, प्रा.शेखर बुलाखे, प्रा.शैलेश सुरवसे, प्रा. महेश खरात, आधी तसेच श्री भानुदास भोरे ,श्री विठ्ठल नंदनवार,
श्री काशिनाथ म्हस्के, श्री दीपक गायकवाड ,श्री बबनराव शितोळे, श्री नानासाहेब आढाव श्री अशोक भंगाळे,श्री ताराचंद चौधरी ,श्री विलास कांबळे , श्री विलास हिंगे,श्री लक्ष्मण मांजरे व अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.