पुणे : अध्यात्मिक गुरू प.पू.दिघे मावशी यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या 'निर्मिती 'या ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या 'क्रिएटिव्ह माईंड्स ' या आंतरशालेय निबंध,चित्रकला,रांगोळी आणि मेहेंदी या स्पर्धाचा बक्षीस समारंभ रविवार, दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.मुक्तांगण शाळेचे सभागृह(अरण्येश्वर) येथे सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होईल.या स्पर्धेत १० शाळेतील ५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.या समारंभात एकूण १२० बक्षीसे देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला प पू .दिघे मावशी,संजीव दिघे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.'निर्मिती ' तर्फे ही माहिती अनुष्का दिवेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
.