सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे भव्य सत्काराचे आयोजन; प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मुरलीधर मोहोळ, भरत गोगावले, माधुरी मिसाळ, संतोष मेढेकर यांचा विशेष सन्मान

डिजिटल पुणे    05-02-2025 16:33:06

पुणे : पुण्याच्या विविध भागात स्थायिक झालेल्या पोलादपूर तालुक्यातील मूळ रहिवासी एकत्र यावेत या उद्देशाने पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे रविवार, ९ फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभ, स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात  पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक)यांच्या हस्ते  केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ,  महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले,  माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष मेढेकर (उद्योजक ) यांचा  नरवीर तानाजी मालुसरे  आणि सिंहगड  यांची प्रतिमा आणि शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 ते 8 या वेळेत हॉटेल सेंट्रल पार्क, डेक्कन जिमखाना, पुणे येथे  आयोजित करण्यात आला आहे.

अशी माहिती पत्रकार परिषदेत किसनजी भोसले (अध्यक्ष), अरविंद चव्हाण (कार्याध्यक्ष), सुनील कदम (उपाध्यक्ष), राजेंद्र मोरे (सचिव), सचिन पार्टे (सहसचिव), ज्ञानेश्वर साळुंखे (कोषाध्यक्ष), ज्ञानेश्वर साळुंखे (खजिनदार), डॉ. खरोसे (सह-कोषाध्यक्ष), शंकर खरोसे (हिशेबानी), लहू उतेकर (सह-हिशेबानी),  राजू कदम (कार्यकारी) प्रतिनिधी), ॲड.पांडुरंग जगदाळे (सल्लागर) यांनी दिली. 

अधिक माहिती देताना अध्यक्ष किसन भोसले म्हणाले की, पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे शहरात गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी आणि आरोग्य क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहे. हाच उद्देश पुढे नेत यावर्षी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सुमारे 68 गावातील नागरिक सहभागी होणार आहेत. यावेळी स्नेह मिलन कार्यक्रम होणार असून, त्यात होम मिनिस्टर क्रीडा पैठणीची स्पर्धा होणार आहे. विजेत्या महिलेला पैठणी साडी आणि पोलादपूरची प्रसिद्ध नथ  देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील पोलादपूर तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. पोलादपूर तालुका रहिवासी संघटना, पुणे यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान  करण्यात येतो.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती