पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक स्व. बाबुरावजी घोलप साहेब यांच्या स्मृती सप्ताह निमित्त सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स फेअरचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या फेअरचे उद्घाटन झाले .या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा. विजय घारे, डॉ. चंदा हासे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. अनंत पवार, डॉ. मेधा मिसार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.या इलेक्ट्रॉनिक्स फेअर मध्ये विभागातील विद्यार्थ्यांनी सेफ्टी, आयोटी, कम्युनिकेशन, स्मार्ट अॅप्लीकेशन, ऑटोमेशन, पेरीफेरेल्सवर आधारित प्रोजेक्ट, मॉडेल्स डेमो द्वारे सादरीकरण केले. रासबेरी टूल चा वापर करून बनवलेला सेल्फी पॉईंट हा विद्यार्थी व प्राध्यापकांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला होता. तसेच यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचे माहिती देणारी माहिती पत्रक विद्यार्थ्यांनी सादर केले.