पुणे : महिलांचे असाधारण योगदान, कार्य, हक्क वसमर्पण याबाबत त्यांचा सन्मान करणे व यामध्यमातून समाजात एक सकारात्मक विचारसरणी बळकट करणे या प्रामाणिक हेतूने दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या लातूर लोकसभेचे लाडके खासदार आदरणीय डॉ. श्री. शिवाजी काळगे व डॉ. सौ. सविता काळगे यांच्या प्रमुख उपास्थितीत जंगम समाजातील श्री व सौ यांनी एकत्रित येऊन एक आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी सर्व उपास्थित महिला भगिनींना खा. डॉ. शिवाजी काळगे व डॉ. सौ. सविताताई शिवाजी काळगे यांनी शुभेच्छा दिल्या आणि महिलांच्या सर्व क्षेत्रातील वाढत्या योगदानबद्दल कौतुक केले. श्रीकांत हिरेमठ यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून मोत्याची माळ, स्नेह वस्त्र व गुलाबाचे फुल देऊन सर्व उपास्थित पुरुष मंडळींनी आपल्या अर्धांगिनीना सन्मानित केले व सर्व महिलांनी केक कापून महिला दिन साजरा केला.

उमाकांत माळभागे, श्रीकांत हिरेमठ, अॅड. गुरुनाथ मळभागे, नागेश स्वामी मानखेडकर, डॉ सचिन बालकुंदे या समजबंधवाचा त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व यशाबद्दल मा. खासदार डॉ शिवाजी काळगे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. सौ. सविताताई काळगे व सौ. शिवकांता ताई मळभागे यांनी महिला दिनाचे महत्व सांगून प्रभावी मनोगत व्यक्त केले तर खा. डॉ. शिवाजी काळगे साहेब यांनी अध्यक्षीय समारोप करताना महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देत या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जगदीशजी स्वामी यांनी केले तर आभार सौ. वैशालीताई खटाळकर स्वामी यांनी मानले तर संचलन प्रा. डॉ. सुधीरजी मठपती यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री शिवचरन स्वामी, नागेश स्वामी माणखेडकर,जगदीशजी स्वामी, श्रीकांत हिरेमठ, बस्वराज सुगावे, सुधीर मठपती CA महेश सुगावे, आदि बांधवानी यशस्वी प्रयत्न केले.
