सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 व्यक्ती विशेष

शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत आघाडी पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले

MSK    28-08-2024 15:46:18

पुणे : महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी येणाऱ्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे.

पक्षाचे मजबूत संघटन व प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या पाहता राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील साहेब यांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे अर्ज उपलब्ध आहेत.

दिनांक २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत अर्ज स्विकारण्याची मुदत असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग : १० हजार रुपये

इतर प्रवर्ग : ५ हजार रुपये

टीप : 

- शुल्क केवळ डिमांड ड्राफ्ट (DD) स्वरूपात स्वीकारले जाईल.

- "नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार" या नावे डिमांड ड्राफ्ट देण्यात यावा.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती