सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 व्यक्ती विशेष

अरविंद केजरीवाल यांच्या जामीनामुळे पुण्यामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला

डिजिटल पुणे    14-09-2024 10:25:55

पुणे : 'आज सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दिलेला जामीन हा फक्त आम आदमी पार्टीसाठी नव्हे तर भारतातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत मोठा दिलासा देणारा लोकशाही आणि संविधानावरती विश्वास दृढ करणारा असा आदेश आहे. मोदी सरकारच्या कारस्थानी कार्यपद्धतीमुळे सीबीआय ही पिंजरातील पोपट झाली आहे.  आणि याबाबतची टिप्पणी खुद्द न्यायाधीशांनी निर्णयात केली आहे. तसेच जामीन हाच नियम आणि अटक ही अपवादात्मक स्थितीतच करायची हे अधोरेखित केले आहे. न्यायाधीश भुयान यांनी सीबीआयने आपली प्रतिमा सांभाळलेली पाहिजे आणि ईडीच्या केसमध्ये जामीन आदेशा नंतर तातडीने सीबीआयने अटक करणे याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ही निरीक्षणे सुप्रीम कोर्टाने केलेली असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रीग् अक्ट, पि एम एल ए, या कायद्याच्या गैरवापराला सुद्धा आळा बसेल ' असे मत आप चे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली आहे

' तथाकथित मध्य घोटाळ्यात एक पैशाचा सुद्धा पुरावा तपासी यंत्रणांना देता आलेला नसून हे सर्व आम आदमी पार्टीची घोडदौड रोखण्यासाठीच आहे असे यामधून स्पष्ट दिसते आहे. मनीष सिसोदिया, संजय सिंग, विजय नायर, के कविता आणि आता अरविंद केजरीवाल यांच्या सुटके ने विरोधकांना चौकशीच्या नावे अटकेत ठेवण्याचे कारस्थान मोदी सरकार करीत होते हे स्पष्ट झाले आहे. 

आजच्या अरविंद केजरीवाल यांच्या जामीनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून पुढील वर्षातील दिल्ली निवडणूक आत्ताची हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणूक अधिकच कडवी होणार आहे '  अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी दिली आहे.

पुण्यात शनिवार वाडा चौकात आम आदमी पार्टी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून  आनंद  साजरा केला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती