सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 व्यक्ती विशेष

भाजप आमदार देखील पक्ष सोडणार?

डिजिटल पुणे    18-09-2024 16:14:58

पुणे : पुणे जिल्ह्यातील चिंचवड हा सर्वात जास्त मतदार संख्या असलेला संघ आहे, आता या मतदारसंघातून  मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप ह्या आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर भाजपचे शहाराध्यक्ष शंकर जगताप यांनीही मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. शंकर  जगताप हे अश्विनी जगताप यांचे दिर आहेत, त्यामुळे  निवडणूकीवर यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे.  

तसेच अश्विनी जगताप या शरद पवार गटात जाण्यांची शक्यता दर्शवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुक त्या तुतारी या चिन्हावर लढविणार असल्याचेही बोललं जात असून त्याला शरद पवार यांचाही होकार असल्याचं समजत आहे. 

 शरद पवार गटाकडून जगताप कुटुंबातील व्यक्तीच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजत आहे. तसेच शंकर जगताप यांच्यावर नाराज असलेल्या भाजपचे माजी २० नगरसेवक देखील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. नुकतेच माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपच्या सदस्यसत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आता अश्विनी जगताप यांच्यासोबत मोठा गट बाहेर पडल्यास चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का असेल असे  राजकीय तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती