सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 व्यक्ती विशेष

राज ठाकरेंना आणखी धक्का, विश्वासू नेत्याचा, उद्धव ठाकरे गटात प्रवेश

डिजिटल पुणे    16-11-2024 10:41:48

नाशिक : मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. नाशिकमधील मनसेचे प्रमुख पदाधिकारी व महापालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. नाशिक विधानसभा लढवण्यासाठी ते इच्छूक होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे समर्थकांसह त्यांनीही पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येथे महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. दरम्यान, येथे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे गणेश गिते आणि महायुतीकडून भाजपचे अॅड. राहुल उत्तमराव ढिकाले निवडणूक रिंगणात आहेत.

नाशिकचे माजी महापौर आणि मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केलाय. अशोक मुर्तडक हे नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना अडीच वर्ष महापौर होते. त्यांनी शिवबंधन बांधल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जातंय.

सध्या अशोक मुर्तडक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यकर्त होते. आता त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. अशोक मुर्तडक हे नाशिकमधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांच्याऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी देण्यात आल्याने मुर्तडक हे नाराज होते. अशात त्यांनी  थेट मनसेला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंची साथ निवडली आहे.

कोण आहेत अशोक मुर्तडक?

अशोक मुर्तडक हे मनसेच्या तिकिटावर नाशिक महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. 2014 मध्ये नाशिकच्या महापौरपदासाठी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना संधी दिली होती. त्यांनी अडीच वर्ष नाशिकचं महापौरपद भूषवलं आहे. अशोक मुर्तडक हे राज ठाकरे यांचे विश्वासू मानले जात होते. त्यांनी आता ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना धक्का देत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल 15 नोव्हेंबररोजी ‘आम्ही हे करू’ या यावाने आपला जाहीरनामा प्रकाशीत केला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष्य देण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीरनाम्यात चार महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासन देण्यात आली आहेत.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती