सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 व्यक्ती विशेष

मुख्यमंत्री कोण हवा? फडणवीसांना धक्का, ठाकरेंना पसंती

डिजिटल पुणे    22-11-2024 12:50:41

मुंबई :  महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ५९ टक्के मतदान झालं आहे. महाविकास आघाडी की महायुती याचा फैसला २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र मतदान संपल्यानंतर तातडीने एक्झिट पोल्स समोर आले आहेत. विविध दहा एक्झिट पोल्सपैकी सहा पोल्सनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहेत. एका एक्झिट पोलने  मुख्यमंत्री म्हणून कुणाला लोकांची सर्वाधिक पसंती आहे आणि कुणाला कमी पसंती आहे याचा अंदाज वर्तवला आहे.

एक्सिस माय इंडिया या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, 288 जागांपैकी महायुतीला 178-200 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 288 पैकी केवळ 82-102 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना 31 टक्के, उद्धव ठाकरेंना 18 टक्के, देवेंद्र फडणवीसांना 12 टक्के, अजित पवारांना 2 टक्के, शरद पवारांना 5 टक्के, काँग्रेसच्या नाना पटोले यांना 2 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांना 1 टक्के लोकांची पसंती आहे. तर, काँग्रेसकडून इतर कोणालाही 10 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती