सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 व्यक्ती विशेष

निवडणुकीचा निकाल लागताच लाडकी बहिण योजनेबाबत अजितदादांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!

डिजिटल पुणे    02-12-2024 16:37:47

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात प्रश्न सुटत नाहीत म्हणून आम्हाला जनआंदोलन करावे लागते. आमचे आंदोलन दडपले जाणार नाही, हा शब्द द्या. आंदोलन चिरडू नका. अन्यथा त्रास होईल,’ असा इशारा डॉ. बाबा आढाव यांनी दिला. त्यावर अजित पवार यांनी ‘लोकशाही मार्गाने आंदोलन करणे बाबांचा अधिकार आहे. त्यांचे आंदोलन चिरडले जाणार नाही. आम्ही पुरोगामी विचारांचे आहोत,’ असे स्पष्ट केले.

‘लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला. विरोधात बसून प्रश्न सुटत नाहीत. सत्तेत येण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली,’ अशी कबुली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. ‘पाच महिन्यांत जनमत बदलले त्याला आम्ही काय करणार? लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम चांगले होते. आता चुकीचे कसे,’ असा सवालही त्यांनी केला.

‘लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी तीन हजार रुपयांची घोषणा केली. विरोधकांनी मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने यापूर्वी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना आणली होती. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये वीज व पाणी मोफत दिले. त्यांच्या पक्षाने पंजाबमध्ये विविध योजना आणल्या. कष्टकरी महिलांना आम्ही थोडा आधार दिला तर आम्हालाच दोष का दिला जात आहे,’ असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळवत 233 जागांवर यश मिळाले. निवडणुकीपूर्वी सरकारने लागू केलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेवर विरोधकांनी टीका करत, ही योजना फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबवली असल्याचा आरोप केला. यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीसाठीच योजना आणल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "लोकसभेला पराभव झाल्यानंतर आम्ही योजना आणली. महिलांना मदत देण्यात चुकले कुठे? इतर राज्यांतही मोफत पाणी, वीज, प्रवास योजना होतात; मग तो प्रलोभन नाही का?"


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती