सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 व्यक्ती विशेष

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राजभवनात दाखल ; सत्तास्थापनेचा दावा करणार

डिजिटल पुणे    04-12-2024 16:14:46

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. तेथे ते सत्तास्थापनेचा दावा दाखल करणार आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या महायुतीचा शपथविधी आहे. सध्या पत्रकार परिषद सुरू आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर आता महायुतीचे तीनही नेते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता राजभवनावर दाखल झाले आहेत. राजभवनात राज्यपाल  सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीच्या विधीमंडळाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी सर्वांनी एकमताने मुख्यमंत्रिपदासाठीही त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आज दुपारी अडीच्या सुमारास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शुिंदे अजित पवार यांच्या सह महायुतीतील काही नेते राजभवनावर दाखल झाले. तीनही नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला.  उद्या मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. उद्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती आहे

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिदेत बोलताना फडणवीस म्हणाले,  राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर पाच तारखेला संध्याकाळी पाच तारखेला शपथविधीची वेळ दिली आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट, जनसुराज्य, पक्ष रासप आणि इतर मित्रपक्ष अशी महायुती झाली आहे. या सर्वांच्या सहीचे पत्र आम्ही दिलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्या समर्थनार्थ पत्र दिले. महायुतीकडून माझा मुख्यमंत्रीपदी शपथविधी करावा, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. अजित पवार यांनीदेखील त्याच आशयाचे पत्र राज्यपालांकडे दिले आहे. या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी आम्हाला निमंत्रित केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आझाद मैदानावर हा सोहळा पार पडेल. उद्या किती लोकांचा शपथविधी होईल याची माहिती संध्याकाळी दिली जाईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद ही आमच्यासाठी टेक्निकल अरेंजमेंट आहे. यापुढे आम्ही तिघेही एकत्रितरित्या सरकार चालवणार आहोत. आम्ही तिघेही आणि आमच्या पक्षांतील इतर नेते एकत्रितपणे चांगले आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू, आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे प्रयत्न करत राहू.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती