सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 व्यक्ती विशेष

मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; मोदी है तो मुमकीन है

डिजिटल पुणे    04-12-2024 16:21:07

मुंबई : भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या कौलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली हरियाणापासून महाराष्ट्रापर्यंतच्या विजयाचा उल्लेख केला. "एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है," असे सांगत राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा ठराव आज मंजूर करण्यात आला. यानंतर फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर फडणवीसांनी तीन वेळा मुख्यमंत्री पदावर बसवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ७२ तासच का असेना पण तांत्रिकदृष्ट्या मी मुख्यमंत्री होतो असे फडणवीस म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक बहुमताविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, “२०१९ सालीदेखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला आणि त्या कळात जनतेबरोबर बेईमानी झाली. मी इतिहासात जाऊ इच्छित नाही, आपण नवी सुरूवात करतोय, पण या गोष्टीचा नक्की उल्लेख करेन की, पहिल्या अडीच वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांना, आमदारांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीत अडीच वर्षात एकही आमदार किंवा नेता आपल्याला सोडून गेला नाही. या काळात सर्व नेते संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळेच २०२२ साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं”.

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची फडणवीसांची ही तिसरी वळ असणार आहे. २०१९ मध्ये अवघ्या ७२ तासांसाठी देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री बनले होते. याचा उल्लेख उल्लेख करत फडणवीस यांनी पंतप्रधान मोंदींचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान मोदी यांचे मनापासून आभार मानतो, माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलं, अशा एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी बसवलं.

अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो”, असेही मोदी म्हणाले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती