सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

अबू आझमींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राणेंची जहरी टीका; म्हणाले, “औरंजेबाच्या कबरीशेजारी…”

डिजिटल पुणे    04-03-2025 17:08:20

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंजगेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न २४ टक्के होतं, असा दावा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

मुघल सम्राट औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा म्हणजेच आताचा म्यानमारपर्यंत पसरली होती. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हटलं जात असे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी 24 टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती.

देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं उभारली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती, असं अबू आझमी यांनी सांगितलं. यावेळी अबू आझमी यांना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची ज्याप्रकारे हत्या केली, ती योग्य होती का, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अबू आझमी उत्तर न देता निघून गेले. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

औरंग्याबद्दल एवढे प्रेम असल्यास अबू आझमीसारख्या माणसाला औरंजेबाच्या कबरीशेजारी झोपवले पाहिजे.  त्याच्यावर केवळ निलंबन इतकीच कारवाई करणार का असा संतप्त सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

नुकताच छावा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अनन्वित अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हे अत्याचार औरंगजेबाने केले होते. त्यामुळे औरंगजेबाचा निषेध अनेक चर्चा सत्रांमधून आणि सोशल मीडियातून केला गेला. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता वगैरे म्हणत त्याचं कौतुक केलं. ज्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत आता काय निर्णय घेतला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान अबू आझमी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होते आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती