Aug 14 2025 21:13:38   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लोढा-बिढांनी मध्ये येऊ नये, कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंची रोखठोक भूमिका, जैन मुनींनाही सुनावलं!
  • गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागेल.
  • ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
  • कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप

 जिल्हा

मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वेच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

डिजिटल पुणे    26-06-2025 11:47:53

मुंबई  :- राज्यातील सर्व शासकीय कार्यालये स्वमालकीच्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून इमारतींच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात यावे. राज्यात ज्या ठिकाणी विकासकामे सुरु आहेत त्याठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टीने कामांचे, वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाची असणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव  ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपरमुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैसवाल, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांच्यासह पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले.

पुणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, पुणे मेट्रो 1 व 2 मार्गिकेच्या कामाचा आढावा घेत, कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी किनारा महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. यावेळी त्यांनी लोणावळा येथील स्कायवॉक आणि टायगर पॉईंट विकास, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, औंध-पुणे येथील नियोजित एम्स हॉस्पिटल, रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर विकास, मुंबई येथील रेडीओ क्लब जेट्टी, नेरळ-शिरुर-कर्जत रस्ता, सातारा सैनिक स्कूल, परळी (जि. बीड) येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय, पुरंदर विमानतळ, बारामती विमानतळ, बीड विमानतळ, पुणे येथील कृषीभवन, ऑलिम्पिक भवन,  कामगार कल्याण भवन, नगररचना भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, पुणे येथील वीर लहूजी वस्ताद स्मारक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू आणि तुळापूर येथील स्मारक, फुलेवाडा स्मारक आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

 Give Feedback

 जाहिराती