सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 DIGITAL PUNE NEWS

सलग दुसऱ्यांदा IPL विजेतेपदावर RCB ची मोहोर; विजयी मिरवणुकीबाबत संघाकडून मोठे संकेत

डिजिटल पुणे    01-06-2026 15:08:57

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकणाऱ्या RCB ने यंदाही जेतेपद कायम राखत इतिहास रचला आहे.

मात्र, या विजयानंतर चाहत्यांमध्ये विजयी मिरवणुकीबाबत उत्सुकता असताना संघ व्यवस्थापनाने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी बंगळुरूमधील विजय सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक विजयी मिरवणूक आयोजित केली जाणार नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

RCB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चाहत्यांसाठी विशेष संदेश शेअर केला आहे. संघाने चाहत्यांचे अभिनंदन करत हा आनंद घरी आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील हंगामात स्टेडियममध्ये भेटण्याचे आश्वासन देत चाहत्यांनी संघाला पाठिंबा कायम ठेवावा, असे म्हटले आहे.

संघाच्या या संदेशामुळे बंगळुरूमध्ये किंवा एम. चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात यंदा कोणतीही मोठी विजयी रॅली आयोजित केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. RCB च्या या निर्णयामागे सुरक्षा आणि चाहत्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती