सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 DIGITAL PUNE NEWS

विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर; रोहित-हार्दिकच्या फिटनेसबाबतही सस्पेन्स कायम

डिजिटल पुणे    04-06-2026 12:56:09

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून सुरू होणार असून त्यानंतर 13 जूनपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. आयपीएल 2026 मध्ये विराटने शानदार कामगिरी करत आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र अंतिम सामन्यादरम्यान त्याला धावताना त्रास होत असल्याचे दिसून आले होते.

आयपीएलमध्ये 16 सामन्यांत 675 धावा करणाऱ्या विराटच्या अनुपस्थितीमुळे भारतीय फलंदाजीची ताकद काहीशी कमी होणार आहे. त्याच्या जागी कोणत्या खेळाडूची निवड केली जाणार याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

दरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांची संघात निवड करण्यात आली असली तरी त्यांच्या फिटनेसबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. दोघांची अंतिम उपलब्धता वैद्यकीय तपासणी आणि तंदुरुस्ती अहवालावर अवलंबून असणार आहे.

अफगाणिस्तान मालिकेनंतर भारताचा इंग्लंड दौरा होणार असून जुलै महिन्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे विराट कोहली त्या मालिकेसाठी फिट होणार का, याकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती