सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 DIGITAL PUNE NEWS

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम गंभीर आजाराशी देतोय झुंज; वेदना सहन करतही कार्यक्रम सुरूच

डिजीटल पुणे    17-06-2026 11:18:15

मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम सध्या एका आरोग्य समस्येमुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत त्याने ‘पिंच्ड नर्व्ह’ अर्थात नसांवर दबाव येण्याच्या त्रासाशी झुंज देत असल्याची माहिती दिली.

सोनू निगमने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर एमआरआय, सीटी स्कॅनसह विविध वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. या आजारामुळे त्याला तीव्र वेदना होत असून फिजिओथेरपीचे सत्रही अत्यंत त्रासदायक ठरत आहेत. वेदना कमी करण्यासाठी त्याला औषधांचा आधार घ्यावा लागत असल्याचे त्याने नमूद केले.

या उपचारांचा परिणाम त्याच्या घशावरही झाला असून गायक म्हणून ही बाब चिंतेची असल्याचे सोनूने सांगितले. मात्र, प्रकृती ठीक नसतानाही त्याने आपले कोणतेही कॉन्सर्ट रद्द केलेले नाहीत. चाहत्यांशी केलेल्या संवादात तो लवकर बरा होण्याचा प्रयत्न करत असल्याचेही म्हणाला.सोनू निगमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चाहते आणि नेटकऱ्यांकडून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती