सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; किसनराव मोहोळ यांचे निधन

गजानन मेनकुदळे    19-06-2026 10:49:37

पुणे: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. १८ जून) रात्री दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री १०.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किसनराव मोहोळ यांनी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे तब्बल ४० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मोठा ठसा उमटला होता. याशिवाय ते एक नामवंत पैलवान म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या साध्या, मनमिळावू आणि समाजाभिमुख स्वभावामुळे त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले होते.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय, सामाजिक, सहकार आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मोहोळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध स्तरांतून त्यांना सांत्वन केले जात आहे.

किसनराव मोहोळ यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज, शुक्रवार (दि. १९ जून) रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत कोथरूड येथील ‘वेणूकृष्णा’ निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

किसनराव मोहोळ यांच्या निधनाने सहकार, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांच्या स्मृती कायम प्रेरणादायी राहतील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.


 Give Feedback



 संबंधित बातम्या
 जाहिराती
 जाहिराती