सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 शहर

बिहार मधील ऊस उद्योगात महाराष्ट्रातील गुंतवणुकदारांना आवाहन ;ऊस उद्योग गुंतवणूकदार मेळाव्यास चांगला प्रतिसाद

डिजीटल पुणे    22-06-2026 11:00:00

पुणे : बिहार मध्ये उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल , मिळाल्यामुळे मुबलक पाणी, आणि कष्टाळू शेतकरी आहे त्यामुळे पुण्याच्या उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना बिहार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रचंड संधी आहे, असे प्रतिपादन बिहार चे ऊस उद्योग मंत्री संजय कुमार पासवान यांनी केले. बिहार सरकार आणि पुण्यातील टू सिग्मा कंपनी चे संचालक चंद्रशेखर ओगले आणी तिरहुत उद्योगचे संचालक कल्पना बाजपेयी व हरेन्द्र कुमार बाजपेयी च्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे शनिवार,२० जून २०२६ रोजी सायंकाळी गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते.

"मी केवळ बिहारचा प्रतिनिधी नव्हे तर भारतीय सरकारचा प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना आवाहन करायला आलो आहे की आपण ज्या प्रकारे महाराष्ट्राचे नाव उद्योग जगतात देशात आणि परदेशात गाजवले, उज्वल केले, त्याच पद्धतीने आपले तंत्रज्ञान आणि आर्थिक गुंतवणूक करून बिहारलाही उद्योग जगतात पुढे येण्यास, प्रगती करण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी मी पुण्यातील गुंतवणूकदारांना निमंत्रित करण्यास आलो आहे"  "बिहार मध्ये अपार औद्योगिक संधी आहेत, साखर उद्योगाप्रमाणेच इथेनॉल निर्मिती उद्योगातही प्रचंड प्रमाणात संधी आहे, जो उद्योग येणाऱ्या काळात देशात उर्जेची गरज भागविण्यासाठी अत्यावश्यक आहे, असे संजय कुमार यांनी सांगितले.

"चंपारण मध्ये महात्मा गांधी यांच्या यशस्वी आंदोलना नंतर तिथे कोणत्या प्रकारची शेती करावी हा पर्याय शोधला जातो होता तेव्हा ऊसाची शेती हा पर्याय पुढे आला आणि तेंव्हा पासून आजतागायत तिथे ऊस शेती आणि साखर उद्योगाने जोम धरला तो आजवर" असे मत बिहार चे ऊस उद्योग आयुक्त अनिल कुमार झा यांनी व्यक्त केले.सध्या बिहार मध्ये साठ हजार टन साखर उत्पादन होत असून येत्या पाच वर्षांत ते दोन लाख टिसीबी एवढे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही या वेळी झा यांनी सांगितले.


कार्यक्रमात अरुंधती पुरंदरे यांनीही गुंतवणूक विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी नायडू यांनी केले. मेळाव्यात शेवटी पं. संजय गरूड यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला.संदीप दिवाण, किरण लोखंडे,बिहार चे सह साखर आयुक्त वेदव्रत कुमार,मिलिंद गायकवाड, अशोक कालभोर, विजय जगताप, अवधेश सिंह , अशोक यादव ,समीर थोरत, संदीप भैरठ , रविन्द्र केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती