सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 विश्लेषण

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा;शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी योगा गरजेचा- स्मिता चव्हाण

डिजीटल पुणे    22-06-2026 11:02:07

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड पुणे  शारीरिक शिक्षण विभाग, युथ रेड क्रॉस युनिट आणि विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने व मेरा युवा भारत (युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय भारत सरकार) आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग च्या योग प्रशिक्षक स्मिता चव्हाण, शशांक कुलकर्णी, प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, मेरा युवा भारत पुणे जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे, प्रा. नरेंद्र केदारी, प्रा.अरुण शिंदे, स्वप्नील शिंदे  उपस्थित होते.     

या वेळी योग प्रशिक्षक स्मिता चव्हाण यांनी योग साधनेचे महत्त्व सांगितले आणि विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.जसे की वृक्षासन, ताडासन, नौकासन, भुजंगासन, त्रिकोणासन, पश्चिमोत्तासन, इत्यादी आसन व अनुलोम विलोम, भ्रामरी, भस्त्रिका , इत्यादी प्राणायाम सुद्धा शिकवले.योगामुळे शरीरातील अनेक व्याधी दूर होतात. अगदी शरीरातील बद्धकोष्ठता, साखर यांच्यासारखे आजार दूर होतात. मनाला आवश्यक असलेली मनःशांती आणि उत्तम आरोग्य फक्त योगामुळे मिळते, मानसिक स्वास्थासाठी योगा गरजेचा यानंतर सर्वांकडून नियमित योगा व प्राणायाम करेल अशी प्रतिज्ञा घेतली  यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. उपक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. योगेश पवार, डॉ.अशोक शेळके, प्रा.निखिल सातव कार्यालय प्रमुख आशिष परमार,रमेश भिलारे,संजू कुंभार, अशीकांत थोरात यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती