सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मोठी बातमी : 6 टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला, आम्ही शिवसेना वाढवायला निघालो, एकनाथ शिंदेंची फटकेबाजी
  • सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
  • उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट अदृश्य होत जाणं हा संजय राऊतांचा भीम पराक्रम, मंत्री जयकुमार गोरेंचा टोला
  • खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
 विश्लेषण

लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या, अनेक जखमी, 10-12 जण अडकल्याची भीती

डिजीटल पुणे    22-06-2026 17:33:16

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील अलिगंज परिसरात सोमवारी तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये अनेक विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली. जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या. त्यापैकी एक विद्यार्थी लोखंडी ग्रीलवर पडल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे 10 गाड्या आणि 14 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले असून, इमारतीत अद्याप 10 ते 12 जण अडकल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या इमारतीच्या तळमजल्यावर पाळीव प्राण्यांचे दुकान आणि क्लिनिक, तर दुसऱ्या मजल्यावर 'लर्निंग स्पेस' कोचिंग सेंटर तसेच 'हेड हॉपर स्टुडिओ' कार्यरत असल्याची माहिती आहे. दाट धुरामुळे बचावकार्याला अडथळा निर्माण होत असल्याने धूर बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचा वापर करण्यात आला. तसेच अडकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाने शेजारच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंत तोडून प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, बहुतांश विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. काही विद्यार्थी स्वच्छतागृहात आश्रय घेतल्याची माहिती असून प्रत्येक खोली आणि स्वच्छतागृहाची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला तातडीने आणि समन्वयाने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले असून जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती