सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
  • लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
  • मान्सून पुन्हा सक्रिय! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; कोकण, मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीपक टक्कर

डिजीटल पुणे    25-06-2026 14:45:40

पुणे  :  रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या पदग्रहण समारंभात रोटेरियन दीपक टक्कर यांनी अध्यक्षपदाची,दीपक भाटिया यांनी सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी नव्या कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ उत्साहात अरोमी मेस(पाषाण) येथे २४ जून २०२६ रोजी सायंकाळी पार पडला .या नव्या कार्यकारिणीमध्ये मोहन पुजारी, सुनील देशपांडे, के. तारानाथ, दीपक भाटिया,गायत्री श्रीनिवासन,सुलेखा देऊसकर,सुयेश नायर,मनीषा कोनकर,मिलिंद इनामदार,नीलम बेंडे आणि राजकुमार आवळेकर यांचा समावेश आहे. हा पुण्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना रोटरी क्लब आहे.या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल संग्राम पाटील तसेच मान्यवर पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल रवी धोत्रे उपस्थित होते. याशिवाय रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील अनेक वरिष्ठ पदाधिकारी, रोटेरियन आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. 

सात दशकांहून अधिक समृद्ध परंपरा लाभलेल्या रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या कार्याचा गौरव करताना, नव्या नेतृत्वाखाली सेवा, मैत्री आणि समाजहिताच्या प्रभावी उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. नव्या कार्यवर्षाच्या प्रारंभानिमित्त समाजसेवेची नवी उद्दिष्टे आणि व्यापक जनसंपर्क कार्यक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून नव्या पदाधिकाऱ्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. रोटरीच्या ‘सेवेपलीकडे स्व’ या मूल्यांना अनुसरून समाजहितासाठी अधिक प्रभावी काम करण्याचा निर्धार नव्या टीमने व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती