पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालय(कात्रज )येथील शैक्षणिक वर्ष २०२६ -२७ साठी अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स(बी.पी.ई.एस.) ,बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन(बी.पी.एड.) ,मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एम.पी.एड.),डिप्लोमा इन व्हॉलीबॉल कोचिंग ,डिप्लोमा इन बास्केटबॉल कोचिंग,डिप्लोमा इन योग एज्युकेशन ,पीएच. डी .हे अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन चे प्राचार्य डॉ.नेताजी जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली. प्रवेश प्रक्रिया ,शिष्यवृत्ती ,स्पोर्ट कोटा ,प्लेसमेंट संधि विषयी अधिक माहिती ९६०७७७१२१५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेल वर मिळू शकेल.या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एम एच सीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही,असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.