सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टीईटी पेपर फुटी प्रकरण! मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आंसगावकरांची मागणी
  • मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र! उद्या होणारी 'टीईटी' परीक्षा रद्द; ठाण्यातून पेपर जप्त, पोलीस ॲक्शन मोडमध्ये
  • टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला
  • सख्ख्या भावाचाही सियाविरोधात जबाब; 'केतनशी लग्न नको' असं कधीच सांगितलं नव्हतं, तपासाला नवं वळण
 क्राईम

पुण्यात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७.५ किलो अफू जप्त, ४०.३८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

डिजीटल पुणे    27-06-2026 17:19:16

पुणे :पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-2 ने मोठी कारवाई करत 1 किलो 790 ग्रॅम अफू जप्त केले असून, या कारवाईत 40 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी राजस्थानातील एका तस्कराला अटक करण्यात आली आहे.

26 जून 2026 रोजी अंमली पदार्थविरोधी पथक-2 चे अधिकारी व कर्मचारी पुणे शहरात पेट्रोलिंग करत असताना सच्चाईमाता मंदिर, दुगड शाळेजवळ, आंबेगाव (कात्रज) परिसरात संशयित देवेंद्रसिंह प्रेमसिंह शक्तावत (रा. मूळ गाव – भारतसोडा, जि. चित्तौडगड, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान आरोपीकडून 35 लाख 80 हजार रुपये किमतीचे 1 किलो 790 ग्रॅम अफू, 50 हजार रुपयांचा मोबाईल फोन, 4 लाख रुपयांची हुंदाई कंपनीची चारचाकी आणि 4 हजार 200 रुपये रोख, असा एकूण 40 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 289/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क) व 17(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीकडे अफूचा साठा कुठून आला आणि त्यामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वात अंमली पदार्थविरोधी पथक-2 चे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व त्यांच्या पथकाने केली. 


 Give Feedback



 जाहिराती