सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ST तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार! परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम
  • नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
  • नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका
  • नसरापूरच्या नराधमाला फाशी, एकनाथ शिंदे म्हणाले, केतन अग्रवाल केसही फास्टट्रॅकवर घेऊ!
  • नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणाचा निकाल; भीमराव कांबळेला फाशी, 'हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा' म्हणत न्यायालयाचा कडक निर्णय
 क्राईम

उदयपूर दौऱ्यावर सियाच्या आईचा खुलासा; 'चेतनबद्दल केतनला आधीच माहिती होती'

डिजीटल पुणे    29-06-2026 18:23:05

पुणे : लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात दररोज नवे तपशील समोर येत आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे राजस्थानातील उदयपूर व जोधपूर येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर सियाच्या आईने माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले.

सियाच्या आईच्या म्हणण्यानुसार, सिया मे २०२६ मध्ये उदयपूरला तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेली होती. त्या ठिकाणी चेतनची भेट झाली होती. सिया आणि चेतन एकत्र प्रवासाला गेले नव्हते, असा दावा त्यांनी केला. तसेच, चेतन हा तिचा मित्र असल्याची माहिती सियाने स्वतः केतनला आधीच दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी सांगितले की, मार्केट यार्डातील क्रिकेट सामन्यापासून राजस्थान दौऱ्यापर्यंत सिया आणि चेतन हे केवळ मित्र असल्याचेच कुटुंबाला वाटत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची कोणतीही कल्पना आम्हाला नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.

पोलीस कोठडीत सियाने बिअर किंवा मद्याची मागणी केल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. पोलिसांकडून अशी कोणतीही मागणी झाल्याचे नाकारण्यात आल्याचे सांगत, या केवळ अफवा असल्याचा दावा त्यांनी केला.

सियाच्या शिक्षणाबाबत बोलताना तिची आई म्हणाली की, सिया बारावी उत्तीर्ण नाही. अभ्यासात रस नसल्याने तिने घरातून केक बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. ही बाब केतनच्या कुटुंबालाही आधीपासून माहिती होती, असे त्यांनी सांगितले.

मुलीने कधीही चेतनसोबतच्या नात्याबाबत किंवा केतनशी लग्न नको असल्याबाबत घरच्यांना काही सांगितले नव्हते, असे सांगताना तिची आई भावूक झाली. जर याची कल्पना आधी मिळाली असती, तर अग्रवाल कुटुंबाशी बोलून लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला असता, असे त्यांनी नमूद केले.

सियाच्या वडिलांनीही याबाबत खंत व्यक्त करत, प्रेमसंबंधांची माहिती आधी मिळाली असती तर केतनच्या कुटुंबाची माफी मागून हा वाद तेव्हाच मिटवण्याचा प्रयत्न केला असता, असे सांगितले.दरम्यान, न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे सिया दोषी ठरवल्यास कायद्याप्रमाणे तिला कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका सियाच्या आईने व्यक्त केली. मात्र, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून दोष निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाचा असल्याने अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

 

 

 

 

छोट्या जाहिराती

जाहिरात:

व्ही.पी. पॉलीफॅब प्रा. लि.

ॲक्रेलिक | पॉलीकार्बोनेट | PVC | PP | HDPE फॅब्रिकेशन

✔ औद्योगिक अधातू फॅब्रिकेशन

✔ ॲल्युमिनियम वर्कटेबल्स, मशीन गार्ड्स व कव्हर्स

✔ ट्रॉफी, स्मृतिचिन्हे, बॅजेस, लॅपटॉप स्टँड

✔ ॲक्रेलिक लेझर कटिंग, CNC राउटर वर्क

✔ 3D प्रिंटिंग, प्रोटोटाइप व LED फोटो फ्रेम्स

संपर्क: महेश कुगावकर

 9822501194 / 9689916013


 Give Feedback



 जाहिराती