पुणे, : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ख्रिश्चन सेल, पुणे यांच्या वतीने पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुणे शहरात शिस्तबद्ध पोलीस व्यवस्था निर्माण करणे, अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करून ड्रग्स माफियांवर कठोर नियंत्रण आणणे तसेच गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, या उल्लेखनीय कार्यासाठी नागरिकांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आज पुणे आयुक्त कार्यालयात आयुक्त अमितेश कुमार यांचा ख्रिश्चन सेलचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर जे. राजमनी यांच्या हस्ते गौरवचिन्ह आणि शाल प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम झाली असून शहरात शिस्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा सन्मान केल्याचे यावेळी ख्रिस्तोफर जे. राजमनी यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी नगरसेविका हिमाली कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ख्रिश्चन सेलचे महिला पुणे शहराध्यक्ष डॉर्थी आर. थॉमस, येशू डोरेस्वामी , स्टॅन्डली नाथन, कॉलिग वॉश, अरुण पवार, दिव्या संतालिय, जॉन मुनवर सिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी पोलीस आयुक्तांच्या कार्याचे कौतुक करत, भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षेसाठी असेच प्रभावी नेतृत्व कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
छोट्या जाहिराती
जाहिरात:
व्ही.पी. पॉलीफॅब प्रा. लि.
ॲक्रेलिक | पॉलीकार्बोनेट | PVC | PP | HDPE फॅब्रिकेशन
✔ औद्योगिक अधातू फॅब्रिकेशन
✔ ॲल्युमिनियम वर्कटेबल्स, मशीन गार्ड्स व कव्हर्स
✔ ट्रॉफी, स्मृतिचिन्हे, बॅजेस, लॅपटॉप स्टँड
✔ ॲक्रेलिक लेझर कटिंग, CNC राउटर वर्क
✔ 3D प्रिंटिंग, प्रोटोटाइप व LED फोटो फ्रेम्स
संपर्क: महेश कुगावकर
9822501194 / 9689916013