सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 शहर

माजी पंतप्रधान चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त ५ जुलै रोजी परिसंवाद

डिजीटल पुणे    30-06-2026 14:49:40

पुणे : माजी पंतप्रधान  चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त 'चंद्रशेखर :विचार आणि सद्यस्थिती' या विषयावर  ५ जुलै २०२६ रोजी रोजी  परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार दानिश अली ,ज्येष्ठ नेते उल्हास पवार,शेतकरी नेते दिलीप(तात्या )पाटील उपस्थित  राहणार आहेत.वक्ते जेष्ठ पत्रकार  निरंजन टकले मार्गदर्शन करणार आहेत.आरोग्य सेनेचे प्रमुख डॉ.अभिजित वैद्य ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झेलम परांजपे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते अरुणकुमार श्रीवास्तव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हा  कार्यक्रम दि.५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता एस.एम.जोशी फाऊंडेशन,नवी पेठ येथे होणार आहे. चंद्रशेखर यांच्या भारत यात्रा पदयात्रेत  सहभागी झालेल्या  पुणे जिल्ह्यातील  पदयात्रींचा सन्मान करण्यात येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती