सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 क्राईम

भीमराव कांबळेला 'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा; प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी? कायदेशीर प्रक्रिया किती काळ चालू शकते?

डिजीटल पुणे    30-06-2026 14:58:39

पुणे : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयाने 'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा सुनावली आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या आत या प्रकरणाचा निकाल लागल्याने न्यायव्यवस्थेच्या वेगवान कामगिरीचे कौतुक होत असले, तरी आता या शिक्षेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

१ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करत फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याचा निर्णय घेतला. तपास पूर्ण करून अल्पावधीत आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि न्यायालयाने ५५ साक्षीदारांच्या जबाबांसह सर्व पुराव्यांचा विचार करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

फाशीची अंमलबजावणी तातडीने होत नाही

सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली, तरी ती तत्काळ अमलात येत नाही. कायद्यानुसार या शिक्षेला प्रथम उच्च न्यायालयाची पुष्टी आवश्यक असते. त्यानंतर दोषीला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असतो. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही दोषी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करू शकतो. या सर्व टप्प्यांनंतरच फाशीची अंमलबजावणी केली जाते.

यापूर्वीच्या प्रकरणांचा विचार केला तर २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला शिक्षा सुनावल्यानंतर सुमारे चार वर्षांनी फाशी देण्यात आली होती, तर निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना अंतिम शिक्षा अमलात येण्यासाठी जवळपास सात वर्षांचा कालावधी लागला होता. त्यामुळे भीमराव कांबळे प्रकरणातही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे विधिज्ञांचे मत आहे.

न्यायालयाने 'रिअरेस्ट ऑफ रेअर' ठरवले

निकाल देताना न्यायालयाने हा गुन्हा 'रिअरेस्ट ऑफ रेअर' स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले. पीडित मुलगी अवघी तीन वर्षांची होती, तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीविरोधातील वैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही विचारात घेतला. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न तसेच महिलांवरील हल्ल्यांच्या घटनांचा उल्लेख करत आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे निरीक्षण नोंदवले. या गुन्ह्यामुळे समाजमनाला मोठा धक्का बसला असून अशा प्रकरणांत कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तपास पथकाचे कौतुक

या प्रकरणाचा वेगाने तपास पूर्ण करून अल्पावधीत आरोपपत्र दाखल करणाऱ्या पोलिसांचे, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि विशेष सरकारी वकिलांचे न्यायालयाने विशेष कौतुक केले. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यामुळे अल्पावधीत न्याय मिळवून देणे शक्य झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

दरम्यान, न्यायालयाचा निकाल ऐकताच पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले असले, तरी अंतिम न्यायासाठी आता पुढील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

 

 

 

छोट्या जाहिराती

जाहिरात:

व्ही.पी. पॉलीफॅब प्रा. लि.

ॲक्रेलिक | पॉलीकार्बोनेट | PVC | PP | HDPE फॅब्रिकेशन

✔ औद्योगिक अधातू फॅब्रिकेशन

✔ ॲल्युमिनियम वर्कटेबल्स, मशीन गार्ड्स व कव्हर्स

✔ ट्रॉफी, स्मृतिचिन्हे, बॅजेस, लॅपटॉप स्टँड

✔ ॲक्रेलिक लेझर कटिंग, CNC राउटर वर्क

✔ 3D प्रिंटिंग, प्रोटोटाइप व LED फोटो फ्रेम्स

संपर्क: महेश कुगावकर

 9822501194 / 9689916013

 


 Give Feedback



 जाहिराती