सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 शहर

पुणे मनपाच्या वृक्ष संरक्षण व संवर्धन समितीवर कोमल नवले यांची नियुक्ती; हरित पुण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार

डिजीटल पुणे    30-06-2026 16:36:25

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष संरक्षण व संवर्धन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती नगरसेविका कोमल सारंग नवले यांनी दिली. या नियुक्तीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत ही जबाबदारी केवळ पद नसून निसर्ग, पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीची दखल असल्याचे म्हटले आहे.

कोमल नवले यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात झाडे, पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. या विचारांना कृतीची जोड देत पुणे शहर अधिक हरित, पर्यावरणपूरक आणि समृद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या नव्या जबाबदारीच्या प्रवासात नागरिकांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि सहकार्य लाभावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोमल सारंग नवले या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका असून शिक्षण समितीच्या सदस्या आहेत.

 

 

 

छोट्या जाहिराती

जाहिरात:

व्ही.पी. पॉलीफॅब प्रा. लि.

ॲक्रेलिक | पॉलीकार्बोनेट | PVC | PP | HDPE फॅब्रिकेशन

✔ औद्योगिक अधातू फॅब्रिकेशन

✔ ॲल्युमिनियम वर्कटेबल्स, मशीन गार्ड्स व कव्हर्स

✔ ट्रॉफी, स्मृतिचिन्हे, बॅजेस, लॅपटॉप स्टँड

✔ ॲक्रेलिक लेझर कटिंग, CNC राउटर वर्क

✔ 3D प्रिंटिंग, प्रोटोटाइप व LED फोटो फ्रेम्स

संपर्क: महेश कगावकर

 9822501194 / 9689916013

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती