मुंबई : मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता गंभीर दुर्घटनांच्या स्वरूपात समोर येत आहे. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर अचानक मोठे झाड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, एका मुलगा बसमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, झाड कोसळल्याने बसच्या वरच्या भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. झाडाचा आकार मोठा असल्याने ते हटवण्यासाठी जेसीबी आणि अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बसमध्ये अडकलेल्या मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, जखमी झालेल्या 10 विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पावसामुळे धोकादायक ठरलेल्या झाडांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
छोट्या जाहिराती
जाहिरात:
व्ही.पी. पॉलीफॅब प्रा. लि.
ॲक्रेलिक | पॉलीकार्बोनेट | PVC | PP | HDPE फॅब्रिकेशन
✔ औद्योगिक अधातू फॅब्रिकेशन
✔ ॲल्युमिनियम वर्कटेबल्स, मशीन गार्ड्स व कव्हर्स
✔ ट्रॉफी, स्मृतिचिन्हे, बॅजेस, लॅपटॉप स्टँड
✔ ॲक्रेलिक लेझर कटिंग, CNC राउटर वर्क
✔ 3D प्रिंटिंग, प्रोटोटाइप व LED फोटो फ्रेम्स
संपर्क: महेश कुगावकर
9822501194 / 9689916013