सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 शहर

सौ.अरुणा केळकर यांना 'आदर्श आई' पुरस्कार ;रंगत-संगत प्रतिष्ठानचा कार्यक्रम ५ जुलै रोजी

डिजिटल पुणे    30-06-2026 17:50:05

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित आदर्श आई पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून यंदाच्या पुरस्काराने सौ.अरुणा केळकर यांना गौरविण्यात येणार आहे. सौ.केळकर या नेत्रशल्यचिकित्सा क्षेत्रातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थलमॉलॉजी' च्या व्यवस्थापिका आहेत.रुग्णालय व्यवस्थापनात त्यांचे ३५ वर्षाहून अधिक काळ योगदान आहे.रोटरी क्लबच्या अध्यक्षा या नात्याने त्यांनी सामाजिक क्षेत्रातही योगदान दिले आहे.

हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता अक्षरवेल सभागृह, सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजा दीक्षित तसेच अरुणा केळकर यांचे पती ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर तसेच चिरंजीव, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. 

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘आई’ या विषयावर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात म. भा. चव्हाण, प्रभा सोनवणे, अनिल दीक्षित, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, सुजित कदम यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.


 Give Feedback



 जाहिराती