सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सचिन अहिर यांची विधानपरिषद उपसभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीसांनी सांगितला 'अहिर' शब्दाचा अर्थ, शिंदेंकडून शायरीत शुभेच्छा
  • श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
  • मुंबई-ठाणे-पालघरला दुपारी ४ पर्यंत रेड अलर्ट; पुण्याच्या घाटमाथ्यावरही अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात
 DIGITAL PUNE NEWS

'लोकप्रतिनिधींना GPS नव्हे, गद्दार पोझिशनिंग सिस्टम लावा'; मुकुंद किर्दत यांचा उपरोधिक टोला

डिजिटल पुणे    30-06-2026 18:36:49

पुणे : राज्यातील पक्षांतराच्या राजकारणावर सामाजिक कार्यकर्ते मुकुंद किर्दत यांनी उपरोधिक भाष्य करत लोकप्रतिनिधींना 'GPS' अर्थात 'गद्दार पोझिशनिंग सिस्टम' बसवण्याची कल्पना मांडली आहे. पक्षांतराच्या वाढत्या घटनांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी ही उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

किर्दत म्हणाले की, सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष बदलणाऱ्या लोकप्रतिनिधींची महाराष्ट्रात कमतरता राहिलेली नाही. अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मतदारांनाही आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीची राजकीय भूमिका आणि तो नेमका कोणत्या पक्षात आहे, हे समजणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने प्रत्येक लोकप्रतिनिधीला 'GPS' अर्थात 'गद्दार पोझिशनिंग सिस्टम' बसवावी, असा त्यांनी उपरोधिक सल्ला दिला.

त्यांच्या मते, या काल्पनिक प्रणालीमुळे मतदारांनी रात्री आणि सकाळी फक्त 'GPS' तपासला तरी त्यांचा लोकप्रतिनिधी सध्या कोणत्या पक्षात आणि कुणासोबत आहे, याची माहिती मिळेल. त्यामुळे 'सूत्रांच्या हवाल्याने' बातम्या देण्याचीही गरज उरणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

किर्दत यांनी या 'GPS'चा अर्थ 'Gaddar Positioning System' (गद्दार पोझिशनिंग सिस्टम) असा करत ही उपग्रहावर आधारित काल्पनिक नेव्हिगेशन प्रणाली असल्याचे विनोदी शैलीत म्हटले. ही प्रणाली लोकप्रतिनिधींचे स्थान, वेग, वेळ आणि ते सध्या कोणत्या राजकीय पक्षात आहेत, याची माहिती देईल, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली.राज्यातील पक्षांतराच्या राजकारणावर भाष्य करत त्यांनी केलेल्या या उपरोधिक वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती