सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात २४ तासांत ११३ मिमी पावसाची नोंद, जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
 शहर

संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; फरासखाना परिसरात 3 जुलैला सकाळी 7 पासून विशेष नियोजन

डिजिटल पुणे    02-07-2026 17:32:13

पुणे : संकष्टी चतुर्थीनिमित्त शुक्रवार, 3 जुलै रोजी फरासखाना हद्दीतील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत पीएमपीएमएल बस, चारचाकी तसेच जड व अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग लागू राहणार आहेत. 

\संकष्टी चतुर्थीनिमित्त शुक्रवार (3 जुलै) रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे वाहतूक पोलिसांनी मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. ही विशेष वाहतूक व्यवस्था सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत लागू राहणार असून, पीएमपीएमएल बस, चारचाकी तसेच जड-अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरम चौक, बाजीराव रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, जंगली महाराज रोड, गणेश रोड, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, नटराज चौक, दारूवाला पूल तसेच पुणे महापालिका भवन परिसरातील वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही रस्ते तात्पुरते बंद ठेवून वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

वाहतूक शाखेने नागरिकांनी शक्यतो मध्यवर्ती भागात अनावश्यक वाहन घेऊन येणे टाळावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 02-07-2026 22:25:09

वर्दली तून प्रशस्त जागा सारस बागेत हलवून वाहतूकीचा कायमचा तोडगा का काढणेत येत नाही

 Give Feedback



 जाहिराती