सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा
  • तुकाराम मुंढेंच्या आदेशाला कोर्टात चॅलेंज, उच्च न्यायालयात याचिका दाखल; मनमानी, अधिकारांच्या गैरवापराचा आरोप
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
 क्राईम

वाघोली पोलिसांची मोठी कारवाई! मित्राचा खून करून पश्चिम बंगालला पळालेला आरोपी अखेर जेरबंद

डिजिटल पुणे    04-07-2026 15:28:26

पुणे :वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला वाघोली पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि अथक तपासाच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने आपल्या मित्राचा राहत्या खोलीत गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

तपासादरम्यान आरोपी हा पश्चिम बंगालमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढला. पोलीस अंमलदार विशाल गायकवाड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, सुनील कुशाळकर आणि दीपक कोकरे यांच्या पथकाने सातारा येथील एका बांधकाम साईटवरून आरोपीला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गुरुडा अमल साब (वय २५, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अभिनव देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त लोंढे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


 Give Feedback



 जाहिराती