सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण
 जिल्हा

सहकार गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान

डिजिटल पुणे    06-07-2026 11:08:49

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकार गौरव पुरस्कार सोहळा दिनांक 4 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटर नरीमन पॉइंट मुंबई  येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात,बृहन्मुंबई बेरोजगार संस्थां फेडरेशनचे कायदेविषयक सल्लागार तथा सचिव ॲड.प्रमोद सागर तायडे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.नंदकुमार काटकर साहेब यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी आणि समाजहिताच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणून विकासाची नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. अशा मानाच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा आणि मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्याचा सन्मान लाभल्याचा आनंद व अभिमान वाटतो.या भव्य आणि यशस्वी कार्यक्रमाचे आयोजक,महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष मा.आमदार प्रवीणभाऊ दरेकर साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक आभार.त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली,याबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी आहे. सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.मा.आमदार प्रवीणभाऊ दरेकर साहेब यांचे ॲड.प्रमोद सागर तायडे कायदेविषयक सल्लागार तथा सचिव बृहन्मुंबई बेरोजगार संस्थां फेडरेशन यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार मानले. 


 Give Feedback



 जाहिराती