पुणे : टीजेएसबी सहकारी बँक अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने पुण्यातील ऐतिहासिक वास्तु लालमहाल, येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम संघटना हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती श्री. शिवाजीराजे भोसले यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा करत असते.यावर्षी कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर म्हणून पुण्याचे प्रथम नागरिक, महापौर – मा. सौ. मंजुषा ताई नागपुरे या उपस्थित होते. त्याचबरोबर दुसरे प्रमुख पाहुणे माननीय विराजजी टिकेकर (भारतीय मजदूर संघ –केंद्रीय कार्यकारणी सदस्य) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली.
माननीय महापौर सौ. मंजुषा ताई नागपुरे यांनी आपल्या मनोगत मध्ये संघटना, कर्मचाऱ्यांच्या हित साधत आपली सामाजिक बांधिलकी जपून युवा पिढीपर्यंत शिवरायांचा इतिहास पोचवण्याचा कौतुकास्पद कार्य करत असल्याचे सांगितले. त्यांनी येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांनी आपली जबाबदारी समजून पालखी मार्गावर स्वच्छतेची काळजी घ्यावी.
यानंतर शिवव्याख्याते श्री. मंदार परळीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमागील संघर्ष, दूरदृष्टी, न्यायनिष्ठ प्रशासन, राष्ट्रप्रेम आणि लोककल्याणकारी विचार यांवर प्रभावी मार्गदर्शन केले. शिवरायांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावा असे त्यांनी सांगितले. तसेच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्याभिषेक का करण्यात आला याचे महत्त्व विशद केले.
संघटनेच्या वतीने श्री. शरद जाधव (उपाध्यक्ष), श्री. विनोद पाटील (महामंत्री), श्री. लतेश नाईक (कोर कमिटी सदस्य), श्री. समीर चव्हाण (पी.आर.ओ –१ विभाग सचिव), श्री दीपक देशमुख (पी.आर.ओ –२ विभाग सचिव), श्री. देवीशंकर कोरे (पी. सी.आर.ओ – विभाग सचिव) व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास बँकेतील कर्मचारी आपल्या पाल्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण उपस्थिती ही १२७ होती.
अशाप्रकारे शिवराज्याभिषेकाचा हा आनंद उत्सव उत्साहात पार पडला.पुण्यामध्ये गेली दोन दिवस सतत भरपूर पाऊस असताना सुद्धा मोठ्या संख्येने कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी सकाळी लवकर प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला व त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रज्ञा सातपुते, अमृता लेले, संदीप पंडित, गणेश होले, पराग शेटे, ऋषी कांबळे, संकेत विपट, गणेश प्रभाळे, संतोष हवेली, राजु आयरे, राहुल जवळकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन श्रीनिवास जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन दैवशंकर कोरे यांनी आभार प्रदर्शन केले. व कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.
टीजेएसबी सहकारी बँक अधिकारी कर्मचारी संघटना.