सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
 शहर

कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम; एकता पॅनेलचे सर्व ११ जागांवर निर्विवाद वर्चस्व

डिजिटल पुणे    09-07-2026 14:50:45

पुणे : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत एकता पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखत सर्व ११ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत ॲड. सुनीता जंगम यांची अध्यक्षपदी सर्वाधिक मते मिळवत निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख आणि ॲड. राहुल पडवळ यांची निवड झाली. सचिवपदी ॲड. राहुल जाधव, सहसचिवपदी ॲड. मोहन बाराथे, तर खजिनदारपदी ॲड. संभाजी पांचाळ यांनी विजय मिळवला. कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. सुरेखा डाबी, ॲड. अमृता पवार, ॲड. कविता गोरे, ॲड. तेजोमय ननवरे आणि ॲड. संकेत सुपेकर यांची निवड झाली.

शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात शुक्रवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अध्यक्षपदासह एकूण ११ जागांसाठी २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. प्रणय लंगिले, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विलास राजूत आणि ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी काम पाहिले.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर वकिलांच्या हिताचे प्रश्न, न्यायालयीन कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांना गती देण्याची जबाबदारी असणार आहे. नव्या कार्यकारिणीच्या निवडीबद्दल न्यायालयीन वर्तुळातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती