सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
 जिल्हा

ICTPL सीएफएस परवाना तातडीने पूर्ववत करा; आयटीपीएल गेटवर ८५० कामगारांचा एल्गार

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    10-07-2026 11:09:13

उरण : ICTPL (International Cargo Terminal Pvt. Ltd.) च्या सीएफएस परवान्याच्या निलंबनाविरोधात दिनांक ९ जुलै २०२६ रोजी आयटीपीएल गेटवर सुमारे ८५० कर्मचारी, कामगार, कंत्राटी मजूर आणि वाहनचालक यांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले.


आंदोलनादरम्यान झालेल्या सभेत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, तसेच अन्य मान्यवरांनी कामगारांना संबोधित केले. त्यांनी सीएफएस परवान्याच्या निलंबनामुळे शेकडो कामगारांच्या रोजगारावर गदा आली असून त्यांच्या कुटुंबांपुढे उपजीविकेचे गंभीर संकट उभे राहिल्याचे सांगितले.उपस्थित मान्यवरांनी केंद्र व राज्य सरकार, सीमाशुल्क (Customs) प्रशासन आणि संबंधित विभागांना तातडीने हस्तक्षेप करून ICTPL सीएफएसचा परवाना पूर्ववत करण्याची मागणी केली. कोणत्याही प्रशासकीय किंवा कायदेशीर प्रक्रियेचा फटका निरपराध कामगारांना बसू नये, रोजगार सुरक्षित ठेवावा आणि सीएफएसचे कामकाज लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली.


आंदोलनादरम्यान कामगारांनी एकजुटीचे दर्शन घडवत घोषणाबाजी केली आणि "कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे", "सीएफएस परवाना तातडीने सुरू करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उपस्थित नेत्यांनी संघर्ष शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.सदर आंदोलन शांततेत पार पडले. शेवटी सर्व कर्मचारी, कामगार, मजूर आणि वाहनचालकांनी एकमुखाने ठराव मंजूर करून ICTPL सीएफएसचा परवाना पूर्ववत होईपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार  व्यक्त केला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शिवसेना तालुका संघटक बी एन डाकी, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर, पंचायत समिती सदस्य प्रारंभी गावंड, कविता पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते रमाकांत पाटील, ऍड पर्जन्य म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख भूषण ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे उरण उप तालुका अध्यक्ष मुकुंद गावंड, भारतीय जनता पार्टीचे विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड,शिवसेना प्रणित विद्यार्थी सेना रायगड जिल्हा संघटक रोहिदास पाटील,शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर,सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कामगार व शेतकरी वर्गही यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती