सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
  • पुणेकरांना पुन्हा पाणीकपातीचा फटका; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, धरणांतील आवक घटल्याने प्रशासनाचा निर्णय
  • विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
  • ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
 क्राईम

दारूच्या नशेत वाद विकोपाला; आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा फरशीच्या दगडाने खून

डिजिटल पुणे    13-07-2026 10:49:22

पुणे : शहरातील धनकवडी परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. शंकर महाराज उड्डाणपुलाखाली दोन तरुण दारू पित बसले असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादादरम्यान आईवरून शिवीगाळ झाल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने फरशीचा दगड डोक्यात मारून दुसऱ्याची निर्घृण हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही उड्डाणपुलाखाली बसून मद्यपान करत होते. बोलण्याच्या ओघात झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. यावेळी आईवरून अपमानास्पद शिवीगाळ झाल्याने आरोपीचा संताप अनावर झाला. त्याने जवळच पडलेला फरशीचा मोठा दगड उचलून समोरच्या तरुणाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापतीमुळे संबंधित तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी काही तासांतच आरोपी किरण उर्फ बिट्या रवी वाघमारे (वय २४, रा. शंकर वसाहत, संभाजीनगर) याला अटक केली. प्राथमिक चौकशीत आईवरून शिवीगाळ झाल्याच्या रागातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे धनकवडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


 Give Feedback



 जाहिराती