सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
  • पुणेकरांना पुन्हा पाणीकपातीचा फटका; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, धरणांतील आवक घटल्याने प्रशासनाचा निर्णय
  • विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
  • ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
 क्राईम

बारशाच्या आनंदावर शोककळा; विवाहितेच्या मृत्यूनंतर सासरच्यांवर छळ व हत्येचे गंभीर आरोप, पोलिसांकडून सखोल तपास सुरू

डिजिटल पुणे    13-07-2026 12:20:47

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीचे बारसे होण्यापूर्वीच तिच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. अस्मिता प्रतीकसिंह काटकर यांनी रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेतल्याचे समोर आले. घरात बारशाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, या मृत्यूनंतर अस्मिताच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत हा आत्महत्येचा नव्हे तर हत्येचा प्रकार असल्याचा दावा केला आहे.

अस्मिताच्या आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर सतत पैशांसाठी तिचा मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात येत होता. विविध कारणांसाठी रोख रक्कम तसेच ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवावे लागत होते. मुलीच्या बारशासाठी तब्बल ५२ हजार रुपयांचा पाळणा मागवण्याचा आग्रह सासरच्या मंडळींकडून करण्यात आला होता. तसेच बारशाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यासाठीही दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याशिवाय, मुलगा होईल या अपेक्षेने आधीच मुलांचे कपडे खरेदी करण्यात आले होते. मात्र मुलगी जन्माला आल्यानंतर अस्मिताला सतत टोमणे मारले जात होते आणि तिचा मानसिक छळ वाढल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. "आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिची हत्या करण्यात आली आहे," असा गंभीर आरोप अस्मिताच्या आई-वडिलांनी केला आहे.

अस्मिताच्या आईने सासू, सासरा, पती आणि नणंद या चौघांवर मुलीच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर वडिलांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी अस्मिताशी फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी ती बारशाच्या तयारीबद्दल आनंदाने बोलत होती. त्यामुळे अचानक तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, यावर विश्वास बसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतदेहावरील काही जखमांच्या अनुषंगाने व्हिसेरा तपासासाठी राखून ठेवण्यात आला आहे. लग्नाला अवघे एक वर्ष झाल्याने कायदेशीर तरतुदीनुसार न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांची पडताळणी सुरू असून तपास अहवालानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती