पुणे : डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि बदलत्या पत्रकारितेच्या पार्श्वभूमीवर 'डिजिटल पत्रकारिता : संपूर्ण गाईड' हे महत्त्वपूर्ण पुस्तक २९ जुलै २०२६ रोजी प्रकाशित होत आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे पत्रकार, कंटेंट क्रिएटर्स, विद्यार्थी तसेच या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शक ठरणार आहे.
डिजिटल माध्यमांवर माहिती किंवा बातम्या प्रकाशित करणारा प्रत्येकजण पत्रकार असतो का? 'डिजिटल मीडिया पत्रकार' आणि 'डिजिटल कंटेंट क्रिएटर' यांच्यात नेमका काय फरक आहे? डिजिटल पत्रकारितेतील नैतिकता, जबाबदाऱ्या, कायदेशीर बाबी, विश्वासार्हता, बातमी सादरीकरणाची पद्धत तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभाव अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर या पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
३९२ पृष्ठांच्या या पुस्तकाची मूळ किंमत रु. ९९९ असून, प्रकाशनपूर्व विशेष सवलतीत ते रु. ७९९ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. मास मीडिया एक्स्चेंज यांच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकावर DMEJ परिवारातील सदस्यांसाठी विशेष सवलत जाहीर करण्यात आली असून, त्यांना हे पुस्तक रु. ७९९ मध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी सदस्यत्वाचा पुरावा सादर करावा लागेल.
पुस्तक खरेदीसाठी उपलब्ध क्यूआर कोडद्वारे रु. ७९९ इतके शुल्क भरता येईल. त्यानंतर DMEJ सदस्यांनी सदस्यत्वाचा पुरावा सादर केल्यास रु. १०० रकमेचा परतावा तत्काळ दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा पुस्तकाबाबत चौकशी करण्यासाठी 8999776721 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.