सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
  • पुणेकरांना पुन्हा पाणीकपातीचा फटका; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, धरणांतील आवक घटल्याने प्रशासनाचा निर्णय
  • विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
  • ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
 क्राईम

समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या करून पती स्वतःच पोलीस ठाण्यात; तीन निष्पाप चिमुरडींची अवस्था पाहून हळहळ

डिजिटल पुणे    14-07-2026 16:52:38

वाशिम : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रहिवासी सलमान खान नेक खान याने पत्नी हसीना बानो हिची कथितपणे गळा दाबून व डोक्यावर वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो आपल्या तीन लहान मुलांना सोबत घेऊन थेट कारंजा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली.

प्राथमिक माहितीनुसार, सलमान पत्नी आणि तीन मुलांसह कारने महाराष्ट्रात प्रवास करत होता. प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर काही अंतर प्रवास करून त्याने कारंजा पोलीस ठाणे गाठत स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.

घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हत्या नेमकी कुठे, कशी आणि कोणत्या परिस्थितीत झाली याचा तपास सुरू केला आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी दिली.

या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे, आरोपी आणि मृत महिलेची तीन लहान मुले संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत होती. आईचा मृत्यू झाल्यानंतर आणि वडील पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर या निष्पाप मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस ठाण्यात आल्यानंतर ही तिन्ही मुले परिस्थितीची जाणीव नसल्याप्रमाणे शांतपणे एका ब्लँकेटवर झोपून गेली. हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून पोलीस ठाण्यात उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या तीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या पुढील संगोपनाबाबत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती