सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कारला आग, सर्व गाड्या सोडून पळाले, भुयारात धुराचे मोठे लोट वाहतूक बंद!
  • पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; जुन्या गुन्ह्याशी कनेक्शनची चर्चा
 शहर

श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच वाटपाच्या अखंडित सेवार्थ भावनेचे दिंड्यांकडून कौतुक

डिजिटल पुणे    15-07-2026 10:45:21

पुणे: पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी "समर्पण • समन्वय • सातत्य" या त्रिसूत्रीने प्रेरित होऊन आपल्या "श्री सेवा समिती, पुणे" या संस्थेच्या वतीने गेली कित्येक वर्षे आषाढी पालखी वारी सोहळ्याकरीता विविध समजोपायोगी उपक्रम राबवित आले आहेत.

याही वर्षी सदस्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध भागांतून पुणे येथे वास्तव्यास आलेल्या कित्येक वारकरी दिंड्यांना समितीच्या वतीने अनुभवी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन "श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच" चे वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या प्रमुख चालकांच्या हाती हे संच सुपूर्द केले गेले. वारी दरम्यान प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बारीक सारीक गोष्टी अन् उपयुक्त औषधे या संचामधून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. 

समितीच्या वतीने दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित नावलौकिक वाढविणाऱ्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे तसेच "श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच" वाटपाच्या अखंडित सेवार्थ भावनेचे दिंडीतील सर्व वैष्णव भक्तगणांनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. यास प्रतिसाद म्हणून येणाऱ्या काळात असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे समितीचे प्रमुख सदस्य श्री. योगेश तोळेश्वर देवकर आणि श्री. प्रविण सुरेश देवकर यांनी नमूद केले.


 Give Feedback



 जाहिराती