सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
  • सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'
  • देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
  • देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
 DIGITAL PUNE NEWS

बारामतीची श्रावणी राज्यात अव्वल; NEET मध्ये देशात पाचवी, मुलींमध्ये पहिली, सुनेत्रा पवारांकडून व्हिडिओ कॉलवर अभिनंदन

डिजिटल पुणे    18-07-2026 13:01:13

पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या NEET परीक्षेच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बारामतीच्या श्रावणी कुदळेने घवघवीत यश मिळवत महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. श्रावणीने 720 पैकी 710 गुण मिळवत देशात पाचवा क्रमांक, मुलींमध्ये पहिला क्रमांक आणि महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या यशानंतर सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्रावणी ही पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी गावची रहिवासी असून तिचे वडील कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे हे दोघेही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत. बारामतीतील अकॅडमीत शिक्षण घेतलेल्या श्रावणीने सातवीपासूनच NEET ची तयारी सुरू केली होती. आठवीत असतानाच डॉक्टर होण्याचा निर्धार करून तिने सातत्यपूर्ण मेहनत घेतली.

NEET परीक्षेत तिने जीवशास्त्रात 360 पैकी 360, तर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात प्रत्येकी 175 गुण मिळवले. नियमित कॉलेजसह दररोज सुमारे सहा तास अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि अनेक आवडी-निवडींना दिलेला फाटा यामुळे हे यश शक्य झाल्याचे श्रावणीने सांगितले. पहिल्या परीक्षेदरम्यान पेपरफुटीच्या वादाचा आपल्या तयारीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही तिने स्पष्ट केले.

पुढील शिक्षणासाठी दिल्लीत जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याची आणि डॉक्टर बनून देशसेवा करण्याची इच्छा श्रावणीने व्यक्त केली आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि मित्रपरिवाराकडूनही तिचे कौतुक होत आहे.

सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ कॉल, अजितदादांची आठवण

श्रावणीच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे तिच्याशी संवाद साधत मनापासून अभिनंदन केले. तिच्या यशामागे योगदान देणाऱ्या पालक आणि शिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले. तसेच, "दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर तुझ्या या यशाचा त्यांनाही अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहेत," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


 Give Feedback



 जाहिराती