सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
  • सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'
  • देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
  • देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
 क्राईम

पुण्यात सायबर गुन्ह्यांचा कहर! ट्रेडिंग, क्रिप्टो आणि डिजिटल अटकेच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; एका दिवसात अनेक गुन्हे दाखल

डिजिटल पुणे    18-07-2026 14:25:09

पुणे : पुणे शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, ऑनलाईन ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सी, फॉरेक्स गुंतवणूक, बनावट बँक अधिकारी आणि डिजिटल अटकेच्या धमक्यांद्वारे नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे शहर पोलिसांनी 17 जुलै रोजी नोंदविलेल्या गुन्ह्यांमध्ये तब्बल अनेक सायबर फसवणुकीची प्रकरणे समोर आली असून, विविध भागांतील नागरिकांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार दाखल केली आहे.

सायबर पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, गुन्हेगारांनी सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअॅप, मोबाईल कॉल, बनावट वेबसाइट आणि ट्रेडिंग अॅप्सचा वापर करून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. काहींना शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे सांगण्यात आले. विश्वास संपादन केल्यानंतर टप्प्याटप्प्याने लाखो रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेत फसवणूक करण्यात आली. एका प्रकरणात तब्बल 68.43 लाख, दुसऱ्या प्रकरणात 55.43 लाख, तर अन्य प्रकरणांमध्ये 52 लाख, 50.50 लाख, 46.87 लाख आणि 33.31 लाख रुपये लंपास करण्यात आल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकही या सायबर टोळीच्या निशाण्यावर असल्याचे दिसून आले आहे. 73, 80 आणि 84 वर्षीय नागरिकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करण्यात आली. काहींना सरकारी यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून 'डिजिटल अटक' करण्याची धमकी देण्यात आली, तर काहींना बनावट गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडण्यात आले.

सायबर गुन्ह्यांसह चोरी, घरफोडी आणि वाहनांची तोडफोड

सायबर फसवणुकीबरोबरच शहरात चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, बेदरकार वाहनचालकामुळे मृत्यू तसेच वाहनांची तोडफोड अशा घटनाही समोर आल्या आहेत. मुंढवा आणि मांजरी परिसरात धारदार शस्त्रे घेऊन वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याची नोंद झाली आहे. तर एका महिलेच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 7.60 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. दुसऱ्या घटनेत एका महिलेच्या गळ्यातील 1.50 लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. तसेच बेदरकार वाहनचालकामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ऑनलाईन गुंतवणूक करू नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करावी, असे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती