सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
  • सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'
  • देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
  • देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
 जिल्हा

बाबुराव तिडके यांनी इतरांच्या जीवनात आनंद पेरला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    18-07-2026 17:32:51

नागपूर : उमद्या व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या बाबुराव तिडके यांनी नेहमीच जनसामान्यांचा विचार केला. इतरांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके यांना आदरांजली वाहिली. दिंवगत तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चिटणवीस सेंटर येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या वडिलांशी तिडके यांची घनिष्ठ मैत्री होती असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पक्षाच्या पलिकडे मैत्री जपण्याचा त्यांचा स्वभाव होता. सहकाराच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. आपला साखर कारखाना अडचणीत आला त्यावेळी तो वाचावा, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता यावे यासाठी गृहलक्ष्मीचे दागिने त्यांनी तारण ठेवले, इतकी कळकळ त्यांच्यात होती, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तिडके हजरजबाबी होते. भूविकास बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी सोडविल्या. संबंधांमध्ये त्यांनी कधी पक्ष येऊ दिला नाही.सहकार, शिक्षण, सामाजिक अशा क्षेत्रातील ते मार्गदर्शक होते, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. समाजाप्रती कळकळ असलेल्या या नेत्याचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन बाळ कुलकर्णी यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती