सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 राज्य

जंतरमंतरवर आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांचा लाठीचार्ज, इंटरनेट सेवा बंद, मोबाईल जॅमर्स सक्रिय, राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक

डिजिटल पुणे    20-07-2026 12:54:16

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवले. यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला आणि परिस्थिती चिघळताच शीघ्र कृती दलाने (RAF) लाठीचार्ज करत जमाव पांगवला. या कारवाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या घटनेमुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा नेण्याचा निर्धार केला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील केरळ भवनापर्यंतच मोर्चाची परवानगी दिली होती. याला आंदोलकांनी विरोध केला. काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी घातलेले बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रथम आंदोलकांना मागे हटण्याचे आवाहन केले. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच लाठीचार्ज करण्यात आला.

या गोंधळादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहितीही समोर आली आहे. यामध्ये काही पोलीस कर्मचारी आणि आंदोलनकर्ते किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

घटनेनंतर जंतरमंतर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. वॉटर कॅनन, वज्र वाहने, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून, संवेदनशील भागात मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनालाही गदारोळाची किनार लाभली. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.

दुसरीकडे, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. काही प्रतिनिधींना चर्चेसाठी आयुक्तांच्या कार्यालयात बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुढील काही तासांत परिस्थिती कोणते वळण घेते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती