सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
  • : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं
  • विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'युवकांच्या भविष्याशी तडजोड होणार नाही'
  • रितेश-जेनेलियाचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; 'तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे'
 क्राईम

लहानपणी वडिलांचा खून, 23 वर्षांनंतर मुलाचा सूड; पुण्यातील थरारक हत्याकांडाचा उलगडा

डिजिटल पुणे    21-07-2026 15:09:39

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात झालेल्या खूनप्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी उलगडा करत चौघांना अटक केली आहे. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुख्य आरोपीने साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी, मिझान गौसउद्दीन शेख आणि संदीप बाबुलाल कोरी यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि राजगड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला.

तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पुढील तपासात या गुन्ह्यामागील धक्कादायक कारण समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये मंथन वैद्यच्या वडिलांचा खून संजय कडू-देशमुख यांनी केल्याचा आरोप होता. त्या घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने मंथनने आपल्या साथीदारांसह संजय कडू-देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत असून, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा आणि आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती